Atlantic Ocean: अटलांटिक महासागर,अमेरिकेच्या पूर्वेचा महासागर

Atlantic Ocean: अटलांटिक महासागर हा जगातील दुसरा मोठा जलपृष्ठाचा विभाग आहे.’अटलांटिक’ हे नाव ऍटलास या ग्रीक संकल्पनेवरून पडले.या महासागराच्या पश्चिमेस उत्तर व दक्षिण अमेरिका, पूर्वेस यूरोप व आफ्रिका आणि दक्षिणेस अंटार्क्टिका ही खंडे आहेत. २०० पू. रेखावृत्त ही अटलांटिक व हिंदी महासागरांमधील सीमा मानली जाते. उत्तरेचा आर्क्टिक महासागर हा काहींच्या मते अटलांटिकचाच एक उपसमुद्र आहे.

 

टेलिग्राफ पठाराप्रमाणेच बहुतेक सर्वत्र अटलांटिकचा तळ बराचसा सपाट असावा असे वाटले, तरी लवकरच अटलांटिकच्या मध्यावर दक्षिणोत्तर गेलेली एक सागरी डोंगरांची रांग आहे हे समजून आले. २० व्या शतकाच्या सुरूवातीस अंटार्क्टिक व आर्क्टिक विषयक झालेल्या संशोधनामुळे अटलांटिकच्या त्या बाजूंची काही माहिती उपलब्ध झाली. १९२५ नंतर नवीन शोधांमुळे लक्षावधी ठिकाणी खोली मोजून तळरचनेविषयी अचूक माहिती मिळू लागली

 

ग्रीनलंड ते स्कॉटलंडपर्यंत गेलेल्या सागरी डोंगररांगेने उत्तरध्रुवीय व नॉर्वेजियन खोलगट भाग खुल्या अटलांटिकपासून वेगळे केलेले आहेत. या रांगेवरच आइसलॅंड व फेअरो बेटे आहेत. ग्रीनलंड व आइसलॅंड यांमधील डेन्मार्कची सामुद्रधुनी व फेअरो ते स्कॉटलंडमधील टॉम्‌सन वायव्हिल डोंगररांग या ठिकाणी खोली ५०० मी. पेक्षा कमीच आहे. १९३७-३८ नंतर आर्क्टिकची खोली बऱ्‍याच ठिकाणी मोजण्यात आली. ‘लोमानीसॉव्ह रिज्’ ने या दीर्घवर्तुळाकार ध्रुवीय खोलगट विभागाचे दोन भाग झाले आहेत. या रांगेचा माथा सु. १,५०० मी. खोलीवर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *