Valentine Week 2022: मुलीला आपल्या प्रेमाची कदर नसेल तर ,त्या नात्यातून बाहेर पडावे का ?

Valentine Week 2022: मुलीला आपल्या प्रेमाची कदर नसेल तर ,त्या नात्यातून बाहेर पडावे का ? कोरा या प्रसिद्ध मराठी प्रश्नउत्तराच्या वेबसाईट वर  एक छान उत्तर मिळाले ते उत्तर योगिता यांनी लिहले आहे ते आहे तसे खाली देत आहे

या प्रश्ना बाबत प्रथम एक प्रश्न,

आधी तुमचे दोघांचे प्रेम होते आणि आता तिला तुमची कदर नाही की

ती कधीच तुमची कदर करत नव्हतीच आणि तुम्ही एकतर्फी प्रेमात आहात???

पहिला पर्याय असेल तर ठीक आहे की तुम्ही तिला आधी आवडत होतात पण आता ती बदलली आहे, ती तुमच्याकडे लक्ष देत नाही किंवा प्रेम नाही राहिला तुमच्या नात्यात.अशा वेळी नक्कीच तुम्ही त्या नात्यातून बाहेर पडणं योग्य आहे.कारण जसजसे जास्त दिवस तुम्ही एकटेच नात टिकवण्यासाठी प्रयत्न करणार तेवढाच जास्त तुम्हाला त्रास होणार किंवा या नात्यातून बाहेर पडणं जड होणार.

पण,

जर समजा तुम्ही एकतर्फी प्रेमात असाल,तुम्ही वेड्यासारखे तिच्यावर प्रेम करत आहात,आणि तुमची अपेक्षा आहे की तिला तुमच्या प्रेमाची कदर नाहीये तर जरा कठीणच आहे. उद्या मी कोरा वर प्रश्न टाकेन अगदी ४ थी इयत्तेत असल्यापासून मी एका मुलावर जीवापाड प्रेम करते पण त्याला माझ्या प्रेमाची कदरच नाहीये.(आपला सलमान खान हो🤭).तुम्ही तुमच्या कल्पना विलासात असा ठरवणार की तुम्ही प्रेमाच्या नात्यात आहात,तिचाही प्रेम आहे वगैरे वगैरे आणि काही काळ सहन करून तिने तुमच्याकडे दुर्लक्ष करायला सूरवात केली ,तर तुम्ही कोणत्या कारणाने तिला दोषी ठरवू शकता.तिला दुसऱ कोणी आवडत असेल तर किंवा तुम्ही तिच्या ज्या अपेक्षा आहेत प्रियकराबद्दल/जोडीदाराबद्दल तसे नसाल तर..तुम्ही जबरदस्ती प्रेम करायला लावू शकत नाही न!!

बाकी दोन्ही पर्यायमध्ये,नवीन अशी व्यक्ती शोधा जिला तुम्ही आवडता आणि तुम्हाला पण ती आवडते.जबरदस्ती कोणतेच नाते टिकू शकत नाही.एकदा नात्यातील प्रेमाचा ओलावा संपला,की काहीही अर्थ नसतो,मग तुम्ही कितीही खत पाणी घाला प्रेमाचे फुल काही उमलनार नाही!!!

 मला सलमान आवडतोच भले लोक काहीही म्हणोत,त्यामुळे टिप्पणी मध्ये त्याची स्तुति करू नये

1 thought on “Valentine Week 2022: मुलीला आपल्या प्रेमाची कदर नसेल तर ,त्या नात्यातून बाहेर पडावे का ?”

  1. Pingback: Marathi Nibandh: माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण - वैभवी दळवी - ITECH मराठी । मराठी बातम्या माहिती आणि मनोरंजन । Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *