Nitesh Rane Birthday: आज ‘नितेश राणे’ यांचा वाढदिवस ,त्याच्याबद्दल माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी !

Nitesh Rane Birthday: नितेश राणे हे महाराष्ट्रातील युवा नेते व स्वाभिमान संघटना या स्वयंसेवी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. नितेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ह्यांचे पुत्र आहेत. आज २३ जून नितेश राणे यांचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याबद्दल माहित नसणाऱ्या काही खास गोष्टींची माहिती पाहणार आहोत .

  • नितेश राणे यांचे MBA पर्यंतचे शिक्षण लंडन  मध्ये झाले २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्यासाठी  नितेश राणे हे  भारतात आले.
  • नितेश राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना केली .
  • पाणी चोरी व पाणीटंचाइ विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन नितेश राणे यांनी सुरू केले.
  • स्वाभिमानच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले होते .
  • एकाच दिवसात २५,०००हून अधिक रोजगार देण्यात आले होते याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली होती .
  • नितेश राणेंना व्यंगचित्रांची आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *