Diwali date 2022 : दिवाळी कधी आहे , दिवाळी २०२२ सणाची माहिती ,जाणून घ्या सणाच्या तारीखा आणि मुहूर्त

Diwali date 2022 : दिवाळी कधी आहे , दिवाळी २०२२ सणाची माहिती ,जाणून घ्या सणाच्या तारीखा आणि मुहूर्त


दिवाळीचा सण हा सर्वात मोठा सण आहे , जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात .  या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना भेट देते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते.  दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी हा सण साजरा केला जातो. हा पाच दिवस चालणारा उत्सव धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेने संपतो. त्यामुळे धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंतच्या सणाच्या तारीखा आणि मुहूर्त जाणून घेऊयात…

 

धनतेरस 2022 कधी आहे ?

धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते.

धनतेरस प्रारंभ – 22 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 6.02 पासून

धनतेरस समाप्ती – 23 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 6.03 पर्यंत

पूजेसाठी शुभ वेळ – रविवार, 23 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5:44 ते 6.05 पर्यंत

 

नरक चतुर्दशी 2022 तारीख आणि शुभ मुहूर्त

नरक चतुर्दशी हा एक हिंदू सण आहे, जो कार्तिकच्या शालिवाहन शक हिंदू कॅलेंडर महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येतो. दीपावली/दिवाळी या पाच दिवसांच्या उत्सवाचा हा दुसरा दिवस आहे. या दिवशी कृष्ण आणि सत्यभामा यांनी असुर नरकासुरचा वध केल्याचे हिंदू साहित्यात म्हटले आहे.

नरक चतुर्दशी प्रारंभ – 23 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 06.03 वाजता

नरक चतुर्दशी समाप्ती – 24 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 05:07 पर्यंत

 

दिवाळी 2022 तारीख आणि शुभ मुहूर्त 

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.

 

कृष्ण पक्षाची चतुर्दशी तारीख- 23 ऑक्टोबर 24 रोजी संध्याकाळी 6:04 पासून सुरू होऊन 5:28 पर्यंत
कृष्ण पक्षातील अमावस्या – 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:28 पासून सुरू होऊन 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:18 पर्यंत
लक्ष्मी पूजन मुहूर्त – 24 ऑक्टोबर संध्याकाळी 06.53 ते 08.16 पर्यंत
अभिजीत मुहूर्त – 24 ऑक्टोबर सकाळी 11:19 ते दुपारी 12:05 पर्यंत
अमृत ​​काल मुहूर्त – 24 ऑक्टोबर सकाळी 08.40 ते 10.16 पर्यंत

विजय मुहूर्त – 24 ऑक्टोबर, दुपारी 01:36 ते दुपारी 02:21
संधिप्रकाश मुहूर्त – 24 ऑक्टोबर संध्याकाळी 05:12 ते 05:36 पर्यंत

 

गोवर्धन पूजा 2022 तारीख आणि शुभ मुहूर्त

गोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू समाजातील प्रथा आहे. ही पूजा मथुरेच्या आसपासचे लोक विशेषतः करतात. यासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय.

गोवर्धन पूजा प्रारंभ – 25 ऑक्टोबर 2022 दुपारी 4:18 वाजता

गोवर्धन पूजा समाप्ती – 26 ऑक्टोबर 2022 दुपारी 02:42 पर्यंत

गोवर्धन पूजा मुहूर्त – 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.33 ते 26.08.48 पर्यंत

 

भाऊबीज 2022 तारीख आणि शुभ मुहूर्त 

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.

26 ऑक्टोबर दुपारी 01.18 ते दुपारी 03.33 पर्यंत

कार्तिक शुक्ल द्वितीया समाप्ती – 27 ऑक्टोबर 2022 दुपारी 12:45 पर्यंत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *